जश्नेगौसिया नियाज निमित्त कव्वालि व लंगर शिरूर येथे आयोजन
शिरूर प्रतिनिधी- सुदर्शन दरेकर
जश्ने गौसिया नियाज निमित्त शिरूर येथे दी २८/११/२०२४ गुरुवार कव्वालीच्या कार्यक्रम व लंगर(प्रसाद) आयोजन करण्यात आले आहे.
शिरूर येथील इस्लामपुरा आला हजरत मैदान येथे नागरीकांना व महिलांना लंगर चे आयोजन दुपारी १ ते ४ वाजेपर्यंत करण्यात आले आहे. व सांय६/३० ते सांय१० वाजेपर्यंत हिंदुस्थानचे प्रसिद्ध कव्वाल आझीम नाझा( या खाजा करम कर करम की घडी है) व मुजतबा अजीजनाझा( डोंगरी के सुल्तान) यांचा कव्वालीचा कार्यक्रम होणार आहे.
तरी नागरीकांनी व महिलांनी लंगर व कवाल्लीच्या कार्यक्रमास उपस्थित रहावे असे अवाहन कार्यक्रमाचे आयोजक समिर नसिम खान व मित्र परिवाराच्या वतीने करण्यात आले आहे.
